Video
Farmer Loan Waiver : शेतकरी आंदोलनाची पंतप्रधान मोदींना भीती का वाटते?
सध्या केंद्र सरकारच्या मनमानी धोरण आणि निर्णयामुळे विविध समाजघटक आक्रमक आणि संताप व्यक्त करताना दिसतायत. त्यामुळेच आंदोलन, मोर्चा, उपोषण यांनी जोर धरला आहे. आज दिल्लीच्या सीमेवर आणि मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन आणि मोर्चाचं चित्र पाहायला मिळालं. दिल्लीच्या सीमेवर हजारो शेतकरी... जागोजागी बॅरिकेड... राजू शेट्टी, महादेव जानकर आणि सरदार व्ही. एम. सिंह यांच्यासह अनेक नेत्यांना पोलिसांची अटक... तर दुसरीकडे मुंबईच्या आझाद मैदानावर किसान सभेच्या नेतृत्वात हजारो शेतकरी सरकारविरोधात मोर्चा काढत कर्जमाफी, रखडलेला पिकविमा, देवस्थान जमिनीचा प्रश्न यावर आक्रमक झाले आहेत. नेमकं असं काय घडलं की देशभरातील तब्बल १५४ शेतकरी संघटना एकाच मुद्द्यावर रस्त्यावर उतरल्या? भारत-अमेरिका मुक्त व्यापार करार म्हणजे नेमकं काय? मुंबईतील आझाद मैदानावर शेतकरी का मोर्चा करतायत? सरकारची भूमिका काय आहे? या आंदोलनात काय घडतंय? सगळं जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
