Farmer Loan Waive : कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार?

राज्य सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत आतापर्यंत सुमारे १६ लाख ९६ हजार पात्र शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ मिळण्यासाठी या यादीतील शेतकऱ्यांना सीएससी केंद्र किंवा संबंधित बँकेत जाऊन ई-केवायसी अर्थात आधार प्रमाणीकरण करण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, ई-केवायसीच्या प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांच्या स्क्रीनवर दिसणारी कर्जमाफीची रक्कम आणि प्रत्यक्ष कर्ज खात्यावरील थकीत रक्कम यामध्ये तफावत दिसत असल्याने शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे ई-केवायसी करावी की नाही? माहिती चुकीची दिसल्यास काय करावे? तसेच कर्जमाफीची दुसरी यादी कधी येणार? हे आजच्या 'द ॲग्रोवन शो' मधून जाणून घेऊया.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com