Video
Farmer Income : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सरकार काय करत आहे?
भारतीय शेतीसमोरचं खरं आव्हान आता उत्पादन वाढवण्याचं नाही, तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याचं आहे. याच पार्श्वभूमीवर नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक लाहिरी आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एस. महेंद्र देव यांनी भारतीय शेतीसाठी काही महत्त्वाचे बदल सुचवले आहेत. मात्र, या सूचनांमध्ये शेतकऱ्यांनाच उपदेशाचे डोस पाजण्याचं काम करण्यापेक्षा सरकारची कानउघडणी करणं गरजेचं होतं. शेतकऱ्यांना सल्ले देणाऱ्यांची कमी नाही. त्यासाठी भक्कम आधार देणारे धोरण राबवले जात नाही, त्यामुळे शेतकऱ्यांची ही अवस्था आहे, हेही धोरणकर्त्यांनी ध्यानात घ्यायला हवं. नीती आयोगाचे उपाध्यक्ष अशोक लाहिरी आणि पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष एस.महेंद्र देव नेमके काय म्हणाले? त्यांचा भर कशावर होता? जाणून घेऊया या आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
