Video
Farmer ID : ५ हजार रुपयांच्या अग्रिम मदतीबाबत महसूल मंत्री बावनकुळे काय म्हणाले?
Drought Relief Maharashtra:दिवाळीपूर्वीच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पाच हजार रुपये जमा करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. दिवाळी संपून आता पंधरा दिवसांहून अधिक काळ लोटलाय. पण लाखो शेतकऱ्यांना अजूनही या पाच हजार रुपयांची प्रतीक्षा आहे. विशेष म्हणजे, ज्यांच्याकडे फार्मर आयडी आहे, ज्यांनी ई-केवायसी केलीय, सरकारच्या इतर योजनांचे पैसे ज्यांच्या खात्यात नियमित जमा होतात, अशा शेतकऱ्यांनाही अग्रिम मदत मिळालेली नाही. मदत रखडण्यामागे केवळ फार्मर आयडी आणि ई-केवायसीची अडचण आहे की आणखी काही कारणं आहेत? आणि ३० नोव्हेंबरपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली, तर शेतकऱ्यांना पैसे कधी मिळणार? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
