Fall Armyworm Control: मक्यावरील लष्करी अळीचे प्रभावी नियंत्रण कसे करावे?

मक्यावरील अमेरिकन लष्करी अळी.. नावात समजतं की ती मूळ अमेरिकेची आहे. अमेरिका खंडातल्या उष्ण कटिबंध भागातली.. २०१६ मध्ये नायजेरिया आणि मध्य आफ्रिकेत आढळली आणि २०१८ मध्ये पहिल्यांदाच भारतामध्ये मका पिकावर लष्करी अळीची नोंद झाली.. आणि अगदी कमी वेळात ती देशातल्या विविध भागांमध्ये पोहोचली.. याची चार कारणं.. या किडीचे पतंग म्हणजेच प्रौढ अवस्था एका रात्रीत जवळपास १०० किलोमीटर पर्यंतचा प्रवास करु शकतात.. आणि दुसरं कारण एक मादी एका वेळी शेकडो अंडी घालते.. तिसरं कारण, मका अळीसाठीचं अनुकूल हवामान आणि सतत मक्याचं उत्पादन घेणं या कारणांमुळं कमी वेळात या किडीने देशभरात हैदोस घातला.. फक्त मकाच नाही तर ज्वारी, भात, बाजरी, गहू, ऊस आणि भाजीपाला पिकांवरही ती आक्रमण करते.. त्यामुळं येतो महत्त्वाचा प्रश्न या अळीवर नियंत्रण कसं करायचं ते.. त्याचीच माहिती आपण आजच्या या व्हिडीओमधून घेणार आहोत त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com