Video
El Nino Impact : पावसाची तूट कायम राहिल्यास अन्नधान्य महागाई वाढणार?
मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला आहे. पण देशातील पावसाची तूट अजूनही कमी झालेली नाही. उलट यंदाचा मॉन्सून १७ वर्षांतील सर्वांत कमकुवत ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. देशातील पावसाची तूट वाढली तर खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होणार, आणि त्याचवेळी अन्नधान्यांच्या किमतीही वाढण्याची चिंता आहे. म्हणजेच, एकीकडे शेतकऱ्यांच्या उत्पादनाचा प्रश्न आणि दुसरीकडे अन्नधान्याच्या खर्चाचा प्रश्न... या दोन्हींचा थेट संबंध मॉन्सूनशीच आहे. मग मॉन्सून यंदा सर्वात कमकुवत ठरण्याची शक्यता आहे? केंद्र सरकारच्या काय हालचाली सुरु आहेत? जाणून घेऊया आजच्या द अग्रोवन शोमधून....
