Video
El Nino 2027: २०२७ च्या मान्सूनची आत्ताच चिंता नको? एल निनो, आयओडीबाबत तज्ज्ञांनी काय सांगितलं?
Maharashtra Rainfall Forecast:२०२७ च्या मान्सूनवर एल निनोचा परिणाम होणार का? एल निनो, इंडियन ओशन डायपोल आणि एमजेओ यांच्याबाबत आतापासूनच चर्चा सुरू झाल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. मात्र, सध्याची हवामान स्थिती पाहता २०२७ च्या मान्सूनबाबत आत्ताच निष्कर्ष काढणं योग्य नसल्याचं हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केलं आहे.सध्याचा एल निनो किती तीव्र होण्याची शक्यता आहे? तो कधीपर्यंत टिकू शकतो? आयओडी आणि एमजेओची स्थिती काय आहे? २०२७ च्या मान्सूनबाबत आत्ताच चिंता करण्याची गरज आहे का? तसंच पुढचे सात ते आठ महिने दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणत्या नियोजनावर लक्ष केंद्रित करावं? जाणून घ्या या विशेष मुलाखतीत.
