El Nino 2027 : एल निनोच्या प्रभावामुळे तापमानात आणखी वाढ होणार?

Global Warming:दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र होऊ लागल्या आहेत. खरिपापेक्षाही मोठा फटका यंदा रब्बी हंगामाला बसण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात सुरू असलेला एल निनो आता त्याच्या सर्वाधिक तीव्र अवस्थेत पोहोचतोय. त्याचे परिणाम मात्र पुढच्या वर्षभरात जगाला भोगावे लागू शकतात. २०२७ हे जगाच्या तापमान नोंदींच्या इतिहासातील सर्वांत उष्ण वर्ष ठरू शकतं, असा अंदाज 'द इकॉनॉमिस्ट'नं वर्तवलाय. तर दुसरीकडे, एल निनोच्या प्रभावामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत भारतातील खरीप आणि रब्बी हंगामात मिळून जवळपास चार कोटी टन शेती उत्पादन घटण्याचा अंदाज स्टेट बँकेच्या संशोधन विभागानं वर्तवलाय.
Loading content, please wait...