El Nino 2026 : एल-निनोची आता तीव्रता किती वाढली?

विषुववृत्तीय प्रशांत महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राचे पाणी सध्या असामान्यपणे तापले आहे. समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढत असल्याने एल निनोची स्थिती तयार झाली असून, पुढील काही महिन्यांत ती अत्यंत तीव्र होण्याची चिन्हं आहेत. जागतिक हवामान संघटनेच्या अर्थात डब्ल्यूएमओच्या अंदाजानुसार, एल निनो फेब्रुवारी २०२७ पर्यंत कायम राहण्याची शक्यता जवळपास १०० टक्के आहे. त्यामुळे २०२६ च्या अखेरीस आणि २०२७ मध्ये जगभरातील पाऊस आणि तापमानाच्या पद्धतीत मोठे बदल होण्याची शक्यता आहे. काही भागांमध्ये अतिवृष्टी आणि पूर, तर काही भागांमध्ये दुष्काळ आणि तीव्र उष्णतेचा धोका वाढू शकतो. आणि याचा थेट परिणाम शेती, पाणी आणि अन्न उत्पादनावर होऊ शकतो. पण सध्या प्रशांत महासागरात नेमकं काय घडतंय? एल निनोची तीव्रता किती वाढली आहे? फेब्रुवारी २०२७ पर्यंत ही स्थिती कायम राहिल्यास जगभरात पाऊस आणि तापमानाच्या पॅटर्नवर काय परिणाम होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, याचा शेती आणि शेतकऱ्यांवर काय परिणाम होऊ शकतो? या सगळ्याचा आढावा घेऊया, आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com