Video
EL Nino 2026 : आरबीआयच्या मासिक बुलेटीनमध्ये कोणता इशारा देण्यात आला?
‘एल निनो’मुळे यंदाच्या मॉन्सूनमध्ये पावसाचं प्रदेशनिहाय वितरण बिघडण्याचा धोका कायम आहे. पाऊस अपुरा आणि असमान राहिला, तर त्याचा थेट परिणाम शेती उत्पादनावर होऊ शकतो आणि त्यातून अन्नधान्याच्या भाववाढीचा दबाव निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने आपल्या ऑगस्टच्या मासिक बुलेटिनमध्ये हा इशारा दिला आहे. पण दुसरीकडे सरकारकडील धान्यसाठा भक्कम आहे आणि धरणांमधील पाणीसाठाही दहा वर्षांच्या सरासरीच्या जवळ आहे. त्यामुळे पुरवठ्याचं योग्य नियोजन केल्यास हा दबाव काही प्रमाणात कमी होऊ शकतो, असा दावाही या आरबीआयने केला आहे. मग एल निनोचा नेमका धोका काय आहे? देशातील धान्य आणि धरणसाठा किती आहे? आणि महाराष्ट्राची परिस्थिती देशाच्या तुलनेत कशी आहे? या सगळ्याचा आढावा घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
