El Nino 2026 : जागतिक हवामान संस्थेचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढणार?

जगभरातील हवामानावर परिणाम करणाऱ्या एल निनोचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. गेल्या काही महिन्यांपासून एल निनोबाबत विविध हवामान संस्था इशारे देत आहेत. आता त्यात आणखी एका महत्त्वाच्या इशाऱ्याची भर पडली आहे. ऑगस्ट ते ऑक्टोबर या कालावधीत एल निनोची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असल्याचा अंदाज जागतिक हवामान संघटनेने अर्थात WMO ने व्यक्त केला आहे. त्यामुळे जगातील बहुतांश भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त तापमान राहू शकते. त्याचबरोबर पावसाच्या पद्धतीत मोठे बदल होऊन काही भागांमध्ये अतिवृष्टी, तर काही भागांमध्ये दुष्काळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. भारतावर याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो? भारतीय उपखंडासाठी काय संकेत आहेत? आणि हवामानातील आणखी कोणते बदल दिसत आहेत? हेच जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून...
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com