Video
E20 Policy India : केंद्र सरकारच्या ई-२० धोरणाला तांदूळ आणि मक्याची साथ मिळणार?
केंद्र सरकारनं पुन्हा एकदा धोरण लकव्याचं दर्शन द्यायचं ठरवलं आहे, असं दिसतंय. आता देशात साखरेचे भाव विक्रमी पातळीवर पोहोचलेत. गेल्या दोन महिन्यांत साखरेच्या दरात जवळपास १० टक्क्यांची वाढ झालीये. त्यातच यंदा कमी पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात ऊस उत्पादन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडून उसापासून इथेनॉल निर्मितीवर निर्बंध आणण्याचा विचार सुरू असल्याची माहिती समोर आलीये. पण सरकारनं जर उसापासून इथेनॉल निर्मिती कमी केली. तर देशाचं E-20 धोरण कसं टिकणार? मका आणि तांदळाचा वापर वाढवावा लागेल का? आणि साखरेचे दर वाढत असताना साखर कारखान्यांसाठी इथेनॉलपेक्षा साखर उत्पादन करणं फायदेशीर ठरणार का? याच सगळ्या प्रश्नांची माहिती घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
