Video
Drought Update : राज्य सरकार दुष्काळ कधी जाहीर करणार? शेतकऱ्यांना किती मदत मिळणार?
नमस्कार शेतकरी मित्रांनो! राज्यात शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत, मात्र पावसाने दडी मारल्याने खरीप पिकं मान टाकू लागली आहेत. पावसाच्या तुटीमुळे महाराष्ट्रातही दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.शेजारच्या कर्नाटक सरकारने पावसाची तूट लक्षात घेऊन १०१ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. महाराष्ट्रातही दुष्काळ जाहीर करून तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. कोरडवाहूसाठी ५० हजार रुपये, तर बागायतीसाठी ७० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची मागणी केली जात आहे.महाराष्ट्रात पावसाची तूट लक्षात घेता दुष्काळ जाहीर होऊ शकतो का? दुष्काळ जाहीर झाल्यास कोणत्या सवलती मिळू शकतात? कर्नाटकने तातडीने निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारची भूमिका काय आहे? नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पावसाच्या तुटीवर चर्चा झाली का? या सर्व प्रश्नांची सविस्तर माहिती जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये.
