Video
Drought Madat : राज्य सरकार दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देणार कधी?
FarmerRelief:‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळाची तीव्रता वाढली, पिकांचं नुकसान झालं आणि शेतकरी आर्थिक संकटात सापडला. त्यातच नमो शेतकरी महासन्मान योजनेचे दोन हप्ते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेतील मदत आणि मागील वर्षीच्या अतिवृष्टीच्या पॅकेजमधील मोठा निधी अद्याप रखडलेला आहे. त्यामुळे एकीकडे पिकांचं नुकसान आणि दुसरीकडे सरकारी मदतीचा पैसा अडकलेला... मग शेतकऱ्यांची ही आर्थिक कोंडी फुटणार कशी? सरकारच्या तिजोरीतून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा कधी येणार? आजच्या ‘ॲग्रोवन शो’मध्ये याचाच आढावा घेणार आहोत.
