Video
Drought Madat 2026 : राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाहणी दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री काय शब्द दिला?
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मराठवाड्यातील लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनीच पावसाअभावी पिकं हातून गेल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं. तर या परिस्थिती सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे, लवकरच मदत करू अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांनी दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे या विषयांची चर्चा सुरु झाली आहे. तर दुसरीकडे या पाहणी दौऱ्यात शेतकऱ्यांना रोखण्यासाठी बॅरीकेड्स आणि पोलिस तैनात केल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. त्यामुळे या पाहणीत दौऱ्यांवरून टीका होऊ लागली आहे. पण मग मुख्यमंत्री या दौऱ्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना काय म्हणाले? पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी काय सांगितले? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून....
