Video
Drought In Maharashtra : मुख्यमंत्री फडणवीसांना कोणत्या चार आमदारांनी दुष्काळाबाबत लिहिले पत्र?
राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप हंगाम संकटात सापडलाय. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा दीर्घ खंड पडल्याने शेतातली उभी पिकं करपण्यास सुरुवात झालीये. सोयाबीन, कापूस, मका, बाजरी, तूर, मूग आणि उडदासारख्या पिकांवर पाण्याच्या ताणाचा परिणाम दिसतोय. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता उत्पादनाचं संकट उभं राहण्यासोबतच केलेला खर्च कसा भरून काढायचा, हा प्रश्न निर्माण झालाय. या पार्श्वभूमीवर राज्यात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलीये. काही आमदारांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची मागणी केलीये. या पत्रांमध्ये पावसाची स्थिती, पिकांचं नुकसान आणि शेतकऱ्यांसमोर निर्माण झालेलं आर्थिक संकट याकडे सरकारचं लक्ष वेधण्यात आलंय. त्यामुळे आजच्या शोमध्ये या चारही पत्रांमधून समोर आलेल्या मागण्या आणि त्यामागची राज्यातील खरीपाची परिस्थिती याची माहिती आजच्या द ॲग्रोवन शोमध्ये घेणार आहोत....
