Video
Drought Impact: पाण्याअभावी शेतकऱ्याने चार एकर मोसंबीची बाग काढली; दुष्काळाचा फळबागेला फटका
Maharashtra Drought:मराठवाड्यातील दुष्काळाचा फटका आता फळबागांनाही बसू लागला आहे. लाडसावंगी येथील उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त प्रयोगशील शेतकरी बाबासाहेब पडूळ यांच्यावर पाण्याअभावी चार एकरांतील मोसंबीची बाग काढून टाकण्याची वेळ आली आहे. दोन शेततळी आणि विहीर असूनही सिंचनासाठी पुरेसं पाणी उपलब्ध नसल्याने त्यांनी हा निर्णय घेतला.२०१२ च्या दुष्काळात मोठ्या हिमतीने वाचवलेली बाग यंदा मात्र वाचवणं शक्य झालं नाही. बाग वाळल्यानंतर ती काढण्यासाठी होणारा दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च टाळण्यासाठी त्यांनी हिरवी झाडंच काढण्याचा निर्णय घेतला. उपलब्ध पाणी डाळिंब बागेसाठी राखून ठेवण्याचं त्यांनी ठरवलं आहे. दुष्काळामुळे एका प्रयोगशील शेतकऱ्याला घ्यावा लागलेला हा कठोर निर्णय काय सांगतो, जाणून घ्या.
