Video
Drought 2026 : राज्यात उद्यापासून दुष्काळाचे पंचनामे सुरू होणार?
पावसाच्या दीर्घकालीन खंडामुळे खरीप पिकं होरपळून गेली आहेत, त्यामुळे राज्य सरकारनं दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा असल्याने मंत्रिमंडळ बैठकीकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलं होतं. मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दुष्काळी परिस्थितीबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली. मग राज्य सरकारने कोणते निर्णय घेतले? दुष्काळाची पहिली अधिसूचना कधी जाहीर होणार आहे? कर्नाटकच्या दुष्काळाबाबत मुख्यमंत्री काय म्हणाले? आणि राज्य सरकारने मंत्रिमंडळ उपसमिती कशासाठी नेमली आहे? जाणून घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून....
