Video
Drought 2026 : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही
राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढच्या आठवड्याभरात नुकसानीचे पंचनामे करून तातडीने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री किती वेळ आश्वासन आणि ग्वाही देत राहणार? मदतीचा निर्णय नेमका कधी घेणार? असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्र्यांनी मदतीबाबत नवीन माहिती दिली आहे, पण त्यासोबतच वीज पुरवठा, दुष्काळी उपाययोजना याची माहिती दिली. मग मुख्यमंत्री दुष्काळग्रस्तांना आर्थिक मदत देण्यासाठी काय म्हणाले? राज्यातील दुष्काळाबाबत मुख्यमंत्र्यांनी काय माहिती दिली? काजू बदाम प्रकरणावर मुख्यमंत्री काय म्हणाले? जाणून घेऊया आजच्या द अॅग्रोवन शोमधून....
