Video
Drought 2026 : राज्यातील कोणत्या जिल्ह्यांत पावसाची तूट अधिक आहे?
राज्यात पावसानं ओढ दिल्याने शेतकऱ्यांवरील संकट अधिक गंभीर होऊ लागलंय. पावसाचा खंड ४० ते ४५ दिवसांवर गेला आहे. यापूर्वी अशी परिस्थिती अनुभवली नव्हती, असं अनेक शेतकरी सांगतायत. काही भागात २०, ३० तर काही ठिकाणी ४० दिवसांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेलाय, पण पावसाचा थेंबही पडत नाहीय. शेतातली पिकं करपून गेलीत. कशीबशी तगून आहेत, त्यांचं उत्पादन ५० टक्क्यांनी घटलंय. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद, मका आणि बाजरीसारख्या खरीप पिकं हातून गेल्यात जमा आहेत. आता परिस्थिती इतकी गंभीर झाली आहे की, राज्यातील ३६ पैकी २० जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पावसाची तूट नोंदवण्यात आली आहे. राज्याची एकूण पावसाची तूट २७ टक्क्यांवर पोहोचली आहे. काही जिल्ह्यांमध्ये पिकांचं नुकसानही मोठ्या प्रमाणात झाल्याचं कृषी विभागाच्या अहवालातून समोर आलं आहे. मग मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रात नेमकी पिकांची परिस्थिती काय आहे? कोणत्या जिल्ह्यांत कोणत्या पिकांना फटका बसला आहे? विरोधकांकडून काय मागणी केली जात आहे? हेच आजच्या द अॅग्रोवन शोमध्ये समजून घेणार आहोत.
