Dr. P.D. Kamala Jayanthi: कीटकाला न मारता पीक वाचवणाऱ्या डॉ. पी. डी. कमला जयंती

'फळमाशी फळापर्यंत नेमकी कशी पोहोचते?' या एका प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी डॉ. पी. डी. कमला जयंती यांनी तब्बल १४ वर्षे संशोधन केलं. त्यातून जन्माला आलं एक असं तंत्रज्ञान, ज्यामुळे फळमाशीचं नियंत्रण करताना फवारणीचा खर्च कमी झाला आणि शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक पर्याय मिळाला. पण हा प्रवास फक्त एका शोधाचा नाही. हा आहे प्रश्न विचारण्याची हिंमत, संशोधनातील सातत्य आणि भारतीय शेतीसाठी आयुष्य समर्पित केलेल्या एका महिला शास्त्रज्ञाच्या कर्तृत्वाचा प्रवास. 'कर्तृत्ववान ती'च्या या १२व्या भागात जाणून घ्या डॉ. कमला जयंती यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास, त्यांचं संशोधन आणि त्यांचे विचार.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com