Video
Devendra Fadanvis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या घोषणेवरून शेतकरी संघटनेचं महावितरणला पत्र
दुष्काळाच्या उंबरठ्यावर असलेला शेतकरी या भयाण परिस्थितीचा सामना करत असताना मुख्यमंत्री फडणवीस मात्र घोषणा करत आहेत. नुकतचं त्यांनी ४८ हजार कोईत रुपयांचा वीजबिल माफ करण्याची घोषणा केली आहे. खरं म्हणजे यापूर्वी त्यांनी एका कार्यक्रमात अशी घोषणा केली होतीच. पण आता या घोषणेवरून शेतकरी संघटनांनी काही प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यातील काही प्रश्न सांगतो, ही रक्कम नेमकी कशी माफ केली जाणार? राज्य सरकारने हा पैसा महावितरणला प्रत्यक्ष दिला आहे का? की महावितरणच्या खात्यात ही रक्कम निर्लेखित किंवा लेखा-समायोजित केली जाणार आहे? आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, या माफीचा अधिकृत हिशेब शेतकऱ्यांसमोर कधी येणार? हे ते प्रश्न आहेत. आता प्रश्न कोणी उपस्थित केले आहेत? नेमकं शेतकरी संघटनांचं म्हणणं काय आहे? या प्रश्नांचा आढावा घेऊया, आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
