Video
DCS MH Crop Survey : ई-पीक पाहणी अंतर्गत नोंदणीसाठी शेतकऱ्यांना काय काळजी घ्यावी लागणार?
पीकविमा, पीक कर्ज, किंवा शासनाच्या कोणत्याही कृषी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई -पीक पाहणी महत्त्वाची आहे. त्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता अधिक आहे. त्यामुळे तर पिक विमा काढणं गरजेचं आहे. आता त्यासाठी लागते ई-पीक पाहणी आवश्यक असते. पण राज्य सरकारने पीक नोंदणीच्या संपूर्ण प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. यापुढे शेतकरी स्वतः मोबाईलवर पीक नोंदणी करणार नाहीत. त्याऐवजी शासन नियुक्त कर्मचारी शेतात येऊन प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्यानंतरच तुमच्या सातबाऱ्यावर पीक नोंद प्रतिबिंबित होणार आहे. नेमका हा बदल काय आहे? DCS MH अॅप म्हणजे काय? शेतकऱ्यांसाठी काय बदलणार? आणि या बदलाचा पीकविमा, पीक कर्ज आणि सरकारी योजनांवर काय परिणाम होणार? जाणून घेऊया.
