Video
Crop Insurance: पीक विम्यात तांत्रिक उत्पादनाचा ५०% वाटा
Technical Yield:पीक विम्याच्या उत्पादकता निश्चितीमध्ये तांत्रिक उत्पादनाला ५० टक्के वेटेज देण्याच्या नियमावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. पीक कापणी प्रयोगातून कमी उत्पादकता नोंदवली गेली, तरी सॅटेलाइटद्वारे काढलेले तांत्रिक उत्पादन जास्त आल्यास नुकसानभरपाईवर परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. यंदा पीक विम्याच्या बाबतीत शेतकऱ्यांना त्रास होणार नाही आणि योग्य नुकसानभरपाई मिळेल, अशी ग्वाही कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.याशिवाय मागील वर्षीच्या अतिवृष्टी मदत पॅकेजचे वाटप, कृषी विभागातील सुधारणा, कृषी समृद्धी योजना आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी विभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांवरही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
