Crop Insurance : पीक विम्यात प्रॉक्सी ट्रिगर्स का हटवले? यंदा भरपाई कमी मिळाल्यास सरकार मदत करणार?

Maharashtra Crop Insurance:यंदाच्या पीक विमा योजनेतून प्रॉक्सी ट्रिगर्स हटवल्यामुळे शेतकऱ्यांना मिळणाऱ्या भरपाईवर काय परिणाम होऊ शकतो? यंदा सुमारे ८१ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे सुमारे ९५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते; मात्र पीक विम्यातून सुमारे २ हजार कोटी रुपयांची भरपाई मिळाली होती.यंदा कमी शेतकरी सहभाग आणि कमी ट्रिगर्समुळे विमा भरपाई कमी मिळण्याची शक्यता आहे का? या प्रश्नावर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भूमिका स्पष्ट केली. पीक विम्यातील उर्वरित जबाबदारी राज्य सरकार घेण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच प्रॉक्सी ट्रिगर्सबाबत भविष्यात विचार केला जाईल, असेही स्पष्ट केले.पीक विम्याची भरपाई, प्रॉक्सी ट्रिगर्स आणि सरकारच्या भूमिकेबाबत जाणून घ्या सविस्तर.
Loading content, please wait...