Video
Crop Insurance : पीक विमा भरपाईचा बोजा राज्य सरकारवर वाढणार? 80:110 मॉडेलचा पेच काय?
Crop Insurance Compensation Update: पीक विमा योजनेत बदल करून राज्य सरकारने विमा हप्त्यापोटी सुमारे ५ हजार कोटी रुपयांची बचत केल्याचा दावा केला आहे. यंदाच्या खरीप हंगामात विमा कंपन्यांकडे सुमारे १३०० कोटी रुपयांचा विमा हप्ता जमा झाला असून, त्यातून शेतकऱ्यांना जवळपास ३० हजार कोटी रुपयांचे विमा संरक्षण मिळाल्याचे सरकारने सांगितले आहे. मात्र, या योजनेतील ८०:११० म्हणजेच कप अँड कॅप मॉडेलमुळे प्रत्यक्ष पीक विमा भरपाईच्या वेळी राज्य सरकारवर मोठा आर्थिक बोजा पडण्याची शक्यता आहे.
