Video
Crop Insurance : यंदा २५% अग्रीम भरपाई नाही; पीक कापणी प्रयोगावर विम्याची भरपाई ठरणार?
नमस्कार शेतकरी मित्रांनो! २०२३ मध्ये पावसातील खंडानंतर शेतकऱ्यांना २५ टक्के अग्रीम पीक विमा भरपाई मिळाली होती. मात्र, गेल्या वर्षापासून पीक विमा योजनेत करण्यात आलेल्या बदलांमुळे पावसातील खंडानंतर तातडीने अग्रीम भरपाई देण्याची तरतूद नाही.यंदा मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांत पावसाचा मोठा खंड पडला असून पिके वाळत आहेत. अशा परिस्थितीत अग्रीम भरपाईचा ट्रिगर लागू झाला असता तर शेतकऱ्यांना तातडीने २५ टक्के भरपाई मिळाली असती. विशेष म्हणजे मंडळाच्या पातळीवर लागू झालेली भरपाई त्या मंडळातील पात्र शेतकऱ्यांना त्यांच्या विमा क्षेत्रानुसार मिळणार आहे.मात्र, सध्या अनेक शेतकरी नुकसान झालेली पिके काढून टाकत आहेत. त्यामुळे पीक कापणी प्रयोग नेमके कुठे होतील? नुकसानग्रस्त भागातच प्रयोग होणार का? मंडळातील उत्पादकतेची आकडेवारी कशी निश्चित केली जाणार? यंदाच्या पीक विमा भरपाईसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
