Video
Crop Care: पिकाच्या लक्षणांवरुन रोग की अन्नद्रव्यांची कमतरता कशी ठरवावी?
नमस्कार शेतकरी मित्रांनो! पाऊस कमी असतानाही सोपानरावांनी सोयाबीनला संरक्षित सिंचन केलं. मात्र तरीही सोयाबीन पिवळं पडत होतं. पिवळा मोझॅक समजून त्यांनी पांढऱ्या माशीचं नियंत्रण केलं, चिकट सापळे लावले आणि फवारण्याही केल्या. पण पिकाचा पिवळेपणा कमी झाला नाही.तज्ज्ञांनी तपासणी केल्यानंतर मात्र लक्षात आलं की हा कीड-रोगाचा प्रादुर्भाव नसून अन्नद्रव्यांची कमतरता होती.पिकाच्या पानांवर दिसणारी लक्षणं ही रोग, कीड किंवा अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे असू शकतात. मग या लक्षणांवरून नेमकं निदान कसं करायचं? रोग आणि अन्नद्रव्यांची कमतरता ओळखताना कोणत्या गोष्टी लक्षात घ्यायच्या?तुमच्या पिकाचं चुकीचं निदान होऊ नये यासाठी महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊया आजच्या व्हिडीओमधून.
