Cotton Wilt: कपाशीचे पीक अचानक वाळायला लागल्यास काय करावे? | Agrowon

यंदा एल निनोच्या प्रभावामुळे शेतीचं गणित बिघडलं.. सरासरी इतका पाऊस झाला असला तरी तो अगदी कमी कालावधीत झालाय.. त्यामुळं कधी कधी कपाशीचं पीक शेतात हिरवगार दिसत असतं आणि मधेच अचानक कोमेजून वाळायला लागतं.. पण असं लक्षण दिसताच त्याकडं दुर्लक्ष करायचं नाहीये.. आणि बुरशीजन्य रोग म्हणून लगेच फवारणी सुद्धा करायची नाहीये.. तुम्ही म्हणाल हे काय बुवा.. रोप वाळतंय पण म्हणतात आणि औषध पण फवारू नको म्हणताय.. याचं कारण म्हणजे प्रत्येक वेळी हा बुरशीजन्य रोग असतोच असं नाही. अनेकदा ही समस्या असते 'आकस्मिक मर रोगाची.. मग हा आकस्मिक मर नेमका का येतो? तो कसा ओळखायचा? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यावर योग्य उपाय काय? हे सगळं जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओ मध्ये..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com