Video
Cotton Strick Virus: कपाशीवर टीएसव्ही रोगाचा धोका? कसे कराल नियंत्रण?
तुमच्याही कपाशीच्या कोवळ्या पानांवर पिवळसर किंवा जांभळट ठिपके दिसतायेत का? मोठ्या पानांवर काळपट तपकिरी चट्टे पडलेत काय.. पानं वाकडी तिकडी होऊन पिकाची वाढ खुंटतेय का, फुलं आणि पात्यांची गळ होतेय का.. तर हा व्हिडीओ तुमच्यासाठी आहे.. कपाशीच्या फुले लागण्याच्या अवस्थेत पिकावर टीएसव्ही म्हणजे टोबॅको स्ट्रिक विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.. टिएसव्ही व्हायरसच्या प्रादुर्भावामुळं उत्पादनावर मोठा परिणाम होतो.. हा विषाणू कोणता आहे.. त्याचा प्रसार कसा होतो आणि त्याचं नियंत्रण करण्याच्या सोप्या पद्धती कोणत्या.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
