Video
Cotton Rate: देशात शिल्लक कापसाचे प्रमाण ४७ टक्क्यांनी वाढले
cotton imports 2025: देशात यंदा कापसाची आयात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे अडीच पट वाढण्याची शक्यता आहे. जुलै अखेरपर्यंतच ३३ लाख गाठी कापूस आयात झाला असून, यामुळे देशातील कापसाचा साठा लक्षणीय वाढला आहे. शिल्लक कापूस गेल्या वर्षाच्या तुलनेत ४७ टक्क्यांनी वाढून ५७ लाख गाठींपर्यंत पोहोचेल, असा अंदाज कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला आहे.