Cotton, Soybean Rate: कापूस, सोयाबीनचे भाव हमीभावाच्या पुढे सरकले | Agrowon

Cotton Soybean Rates: देशात सुताला उठाव वाढून कापसाला मागणी वाढत आहे. पण दुसरीकडे सध्या बाजारातील कापसाची आवक खूपच कमी आहे. सध्या सीसीआयकडेच कापसाचा सर्वाधिक साठा आहे. त्यामुळे सीसीआयच्या कापसाला उठाव वाढला. सीसीआय प्रत्येक लिलावात २ ते अडीच लाख गाठींच्या दरम्यान कापसाची विक्री करत आहे. मागणी वाढल्यामुळे सीसीआयने मार्च महिन्यात कापूस विक्रीच्या भावात खंडीमागे ३२०० रुपयांची वाढ केली आहे. तरीही सीसीआयच्या कापसाला उठाव कायम आहे.
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com