Video
Cotton Soybean Market Rates; कापूस, सोयाबीन, मका, भेंडी, लिंबू बाजारभाव अपडेट|Agrowon
देशात सोयाबीनच्या भावातील तेजी कायम आहे. बाजारातील आवक सध्या कमी आहे. तर दुसरीकडे सोयाबीनला उठाव चांगला आहे. सोयाबीनच्या भावाला यामुळे आधार मिळत आहे. सोयातेलाचे भावही वाढलेले आहेत तर सोयापेंडलाही उठाव. यामुळे सध्या बाजारात सोयाबीन सरासरी ६ हजार २०० ते ६ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे.
शातील बाजारात कापसाचा भाव मागील काही दिवसांपासून तेजीच आहे. कापसाला मागणी वाढल्याने दरातही चांगली सुधारणा दिसून आली. पाॅलिस्टरचे भाव वाढल्याने कापसाला मागणी वाढलेली आहे. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे. त्यामुळे कापूस भाव सरासरी ८ हजार ४०० ते ८ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. तर काही बाजारांमध्ये कापसाला उचांकी १० हजारांचाही भाव मिळाला.
