Video
Cotton Rate: कापसाचे भाव पडणार की तेजी कायम राहणार? विक्रीचे नियोजन कसे करावे?
Cotton Price:देशातील कापूस बाजारात हंगामाच्या सुरुवातीलाच दरात सुधारणा दिसून येत आहे. यंदा कापूस उत्पादन घटण्याचा अंदाज, कापड उद्योगाकडून मागणी आणि जागतिक बाजारातील घडामोडी यामुळे कापसाच्या दराला आधार मिळत असल्याचे अभ्यासकांचे मत आहे. सध्या महाराष्ट्रात कापसाचा सर्वसाधारण बाजारभाव साडेनऊ हजार रुपयांच्या आसपास असल्याचे सांगितले जात आहे.यंदा कापसाचा हमीभाव किती आहे? सीसीआयच्या खरेदीचा बाजारावर काय परिणाम होऊ शकतो? कापूस आयात शुल्कमुक्त ठेवण्याच्या निर्णयाचा भावावर कसा परिणाम होईल? आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर लक्ष ठेवणे का महत्त्वाचे आहे? जाणून घ्या कापूस बाजाराचा सविस्तर आढावा.
