Cotton Market: कापसाच्या दराला तेजीचा आधार! १० हजारांचा टप्पा गाठणार?

Cotton Rate Today:दिवाळीनंतर कापसाच्या दरात सुधारणा दिसून येत आहे. यंदा महाराष्ट्र, तेलंगणा आणि गुजरातमधील काही भागांत कमी पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीमुळे कापूस उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बाजारातील कापसाची आवकही अपेक्षेपेक्षा कमी दिसत आहे.दुसरीकडे, कापसाचे बाजारभाव हमीभावापेक्षा वर आहेत. गेल्या हंगामाच्या तुलनेत यंदा सीसीआयची कापूस खरेदीही मर्यादित प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. हंगाम पुढे जात असताना कापसाची मागणी वाढल्यास दर १० हजार रुपये प्रतिक्विंटलचा टप्पा ओलांडू शकतात, असा अंदाज बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला आहे.नेमके कापसाच्या दराला कोणते घटक आधार देत आहेत? कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आगामी काळात बाजाराची दिशा कशी पाहावी? जाणून घ्या सविस्तर.
Loading content, please wait...