Video
Cotton Lalya Disorder: कपाशीवरील लाल्या विकृतीच्या लक्षणांवरून कारण कसे ओळखावे?
कपाशीची पानं अचानक लालसर दिसू लागली की लाल्या विकृती समजून लगेच नत्र किंवा मॅग्नेशियमची फवारणी केली जाते. मात्र, कपाशीच्या पानांना लालसरपणा येण्यामागे केवळ नत्र आणि मॅग्नेशियमची कमतरता हेच कारण नसते.नत्र, मॅग्नेशियमसोबत स्फुरद, पालाश आणि गंधकाची कमतरता, पाण्याचा ताण तसेच रसशोषक किडी यांमुळेही कपाशीमध्ये लाल्या विकृती दिसू शकते. मग लाल्याचे नेमके कारण कसे ओळखायचे? लक्षणांवरून प्रादुर्भावाची तीव्रता कशी ठरवायची? आणि योग्य उपाय काय करायचे? तसेच लाल्या विकृती रोखण्यासाठी काय काळजी घ्यायची? जाणून घ्या आजच्या व्हिडीओमधून.
