Video
Cotton Crop: अतिवृष्टीमुळे वाढली कापूस उत्पादकांची चिंता; मरची लक्षणे काय?
cotton crop damage: विदर्भासह राज्यातील कापूस उत्पादक पट्ट्यात दहा–बारा दिवसांचा मोठा पावसाचा खंड पडला होता. मात्र मागील दोन–तीन दिवसांपासून विशेषतः पश्चिम विदर्भातील अनेक भागांत अतिवृष्टी झाली. या मुसळधार पावसानंतर शेतात बराच काळ पाणी साचून राहिल्याने अन्य खरीप पिकांसह कापूस पिकाचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असल्याचे समोर आले आहे.