Video
Weather Update : राज्यात ढगाळ हवामानासह पावसाची शक्यता
Maharashtra Weather Update: राज्यातील अनेक भागांत ढगाळ वातावरणासह पूर्वमोसमी पावसासाठी पोषक परिस्थिती निर्माण झाल्याने उन्हाचा तडाखा काहीसा कमी झाला आहे. कोकणात उष्ण व दमट हवामान कायम असून, पूर्व विदर्भासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
