Video
Cloud Seeding Karnataka : कर्नाटक सरकारने कृत्रिम पाऊस पाडण्याचा निर्णय का घेतला?
राज्यात ऑगस्ट महिना संपत आला आहे. राज्याच्या सरासरी पावसाची तूट १० टक्क्यांवर असली, तरी मराठवाडा आणि विदर्भातील परिस्थिती मात्र अधिक चिंताजनक आहे. मराठवाड्यात तब्बल २६ टक्के, तर विदर्भात २४ टक्के पावसाची तूट आहे. पिकांना आता पावसाची गरज आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न आहे सरकार कृत्रिम पाऊस का पाडत नाही?कारण आपल्या शेजारच्या कर्नाटक सरकारने पावसाची तूट भरून काढण्यासाठी पुढचे ६० दिवस क्लाउड सीडिंग म्हणजेच कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रयोगासाठी तब्बल २७ कोटी रुपये खर्च केले जाणार असून, जवळपास २०० तास विमानांची उड्डाणे केली जाणार आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातही असा प्रयोग करता येऊ शकतो का, या चर्चेने जोर धरला आहे. कारण महाराष्ट्राने यापूर्वी कृत्रिम पावसाचे प्रयोग केलेली आहे. पण या प्रयोगातून खरंच पाऊस वाढतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठवाडा आणि विदर्भातील पिकांना त्याचा फायदा होऊ शकतो का? याचाच सविस्तर आढावा घेऊया आजच्या द ॲग्रोवन शोमधून.
