Video
Citrus Fruit Drop: आंबिया बहरातील संत्रा मोसंबी फळगळ रोखण्यासाठी काय करावे?
ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला संत्रा आणि मोसंबी या फळबागेत आंबिया बहरातील फळांची मोठ्या प्रमाणावर फळगळ झाली.. तज्ज्ञांच्या मते यासाठी बदलतं हवामान जसं उन्हाळ्यातली अति उष्णता, पावसाचा खंड, त्यानंतर अतिवृष्टी, यासोबत नैसर्गिक कारणं, खतांचं नियोजन, संजीवकांचा अभाव, पाण्याचा अनियमित पुरवठा, कीड रोग यांमुळं फळगळ होत असते.. फळगळमुळं मोठं नुकसान शेतकऱ्यांच्या माथी पडतं.. पण यावर फक्त औषधांची फवारणी करून उपयोग होणार नाहीये.. त्यासोबत बागेचं व्यवस्थापन करणंही तितकंच गरजेचं आहे.. त्यामुळं फळगळ रोखण्यासाठी कोणते उपाय करायचे आणि आपलं उत्पादन कसं वाचवावं.. जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
