Government Online Fertilizer Scheme: रासायनिक खतांसाठी तासन्तास रांगेत उभं राहण्याची वेळ आता संपणार आहे. कारण आता शेतकऱ्यांना घरबसल्या मोबाईलवरून खत बुक करता येणार आहे. रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी आणि शेतकऱ्यांना वेळेत खत उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नव्या मोबाईल अॅपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आपल्या परिसरातील खतांचा साठा, उपलब्ध दुकाने आणि खतांची उपलब्धता थेट मोबाईलवर पाहता येणार आहे. इतकंच नाही, तर शेतकरी आपल्या पसंतीच्या दुकानातून खत ऑनलाइन बुकही करू शकणार आहेत. मग हे अॅप नेमकं कसं काम करणार? शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार? आणि खत विक्रीतील गैरप्रकार खरंच थांबणार का? याची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.