CCI Cotton Procurement: सध्या कापूस बाजारावर मोठा दबाव जाणवत आहे. देशात कापसाला सध्या प्रतिक्विंटल सुमारे ७३०० ते ७७०० रुपये दर मिळत असून तो हमीभाव ८११० रुपयांपेक्षा कमी आहे. यामागे आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतार तसेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (CCI) कडे असलेला मोठा साठा ही प्रमुख कारणे मानली जात आहेत. सध्या CCI कडे सुमारे १०२ लाख गाठींचा कापूस साठा असल्याने स्वस्त विक्रीमुळे बाजारभावांवर दबाव निर्माण झाला आहे. दुसरीकडे कापूस खरेदीची मुदत १५ मार्चपर्यंत वाढवण्यात आली असली, तरी प्रत्यक्ष खरेदीसाठी शेतकऱ्यांकडे फार कमी दिवस उरले आहेत. या परिस्थितीत शेतकऱ्यांनी कापूस तातडीने विकावा की काही काळ थांबावे? CCI ची खरेदी, सध्याची बाजारस्थिती आणि पुढील दरांचा अंदाज याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी वरील व्हिडिओ संपूर्ण पहा. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.