Video
Calf Care in Drought: उष्णतेच्या ताणाचा वासरांच्या आरोग्यावरील परिणाम कमी करण्यासाठी काय करावे?
Calf Care:दुष्काळाच्या सावटामुळं हा ऑक्टोबर महिना फार तापदायक ठरतोय.. आत्ताच उन्हाळ्याच्या झळा लागल्यासारखं वाटायला लागलंय.. अशा वातावरणाचा ताण पशुधनावर येऊ शकतो.. पण मोठ्या जनावरांपेक्षा वासरांमध्ये उष्णतेचा ताण हा लवकर येतो.. आणि जिवघेणाही ठरु शकतो.. त्यामुळं वासरांमध्ये उष्णतेचा ताण लवकर ओळखून त्यावर उपाय करणं गरजेचंय.. पण आता प्रश्न येतो, वासरांमध्ये उष्णतेचा ताण नेमकी कसा ओळखायचा.. त्याची लक्षणं काय.. आणि ताण ओळखला किंवा ताण येऊच नये म्हणून काय उपाय करायचे.. काय बदल करायचे.. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत.. त्यामुळं व्हिडीओ शेवटपर्यंत नक्की बघा..
