Video
Buffelo Meat Export : म्हशीच्या मांसाला जागतिक बाजारपेठेत मागणी का वाढत आहे?
देशाच्या कृषी क्षेत्रात पिकांबरोबरच पशुधनही शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा आधार आहे. आणि आता याच पशुधनातून मिळणाऱ्या उत्पादनांना देशाच्या बाजारपेठेपेक्षा जागतिक बाजारपेठेत मागणी वाढताना दिसतेय. मांस, दुग्धजन्य पदार्थ, अंडी आणि इतर पशुधन उत्पादनांच्या निर्यातीने यंदा मोठी झेप घेतली आहे. विशेष म्हणजे म्हशीच्या मांसाची वाढलेली मागणी या निर्यातवाढीचा प्रमुख आधार ठरत आहे. मांसाच्या निर्याती एका वर्षात जवळपास ९५५ दशलक्ष डॉलरची वाढ झाली आहे. पण ही वाढ नेमकी कुठून आली? म्हशीच्या मांसाला कोणत्या देशांमध्ये मागणी वाढली? दुग्धजन्य आणि कुक्कुट उत्पादनांचा निर्यातीत किती वाटा आहे? आणि या वाढीचा फायदा देशातील पशुपालक आणि शेतकऱ्यांना कसा होऊ शकतो? हेच जाणून घेऊया आजच्या द अॅग्रोवन शोमधून...
