Berseem Fodder: हेक्टरी ६०० ते ८०० क्विंटल हिरवा चारा देणाऱ्या घोडा घासची लागवड?

Berseem Grass:यावर्षीचं वातावरण वेगळंय.. पाऊस नाही, भविष्यात चाऱ्याची टंचाई भासण्याची भीती.. त्यामुळं रब्बीमध्ये चारा पिकांची लागवड करण्यावर भर द्यायचाय.. पण चारा पिकाची निवड करताना ती काळजीपूर्वक करायचीये.. कमी दिवसात कापणीला येणारं, बहुकापणी आणि पौष्टिक मूल्य चांगल्या प्रमाणात असलेलं चारा पीक निवडायचंय.. या सर्व निकषांमध्ये येणारं चारा पीक म्हणजे बरसीम.हे कमी खर्चातलं आणि जास्त उत्पादन देणारं चारा पीक असल्यामुळं शेतकऱ्यांसाठी ते फायद्याचं ठरतं.. पण बरसीम कोणत्या जमिनीत चांगलं येतं, त्याचं वाण कोणतं वापरायचं, ते किती दिवसात येतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यापासून किती चारा उत्पादन किती मिळतं हे सगळं जाणून घेऊयात आजच्या या व्हिडीओमधून..
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com