Video
बैलपोळा साजरा करताना बैलांना त्रास होणार नाही म्हणून काय करावे? | Agrowon
“काळ्या मातीत मातीत तिफण चालते...” कवी विठ्ठल वाघांच्या या ओळी ऐकल्या की डोळ्यांसमोर येतो तो काळा माळ, शेतकरी आणि त्याच्यासोबत शेतात राबणारी बैलजोडी. या ओळींमध्ये निसर्ग, शेती आणि शेतकऱ्याचं नातं जितकं सुंदरपणे दिसतं, तितकंच त्या नात्यात बैलांचंही महत्त्व आहे. वर्षभर शेतात राबणारा, शेतकऱ्याच्या कष्टाचा साथीदार, बैल. या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीच बैलपोळा साजरा केला जातो. पण सणाच्या उत्साहात सजावट, मिरवणूक किंवा नवनवीन ट्रेंडच्या नादात काही चुका, तर बैलांच्या आरोग्यासाठी त्रासदायक ठरू शकतात.
