Ativrushti Madat 2025 : अतिवृष्टीग्रस्तांसाठी केंद्र सरकारने निधी का दिला नाही?

Flood Relief:गेल्यावर्षी अतिवृष्टीग्रस्तांसाठी राज्य सरकारने ३१ हजार कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर केलं. मोठमोठ्या घोषणा झाल्या. पण आता या मदतीबाबत धक्कादायक माहिती समोर आलीय. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टी आणि महापुरातील नुकसानीपोटी महाराष्ट्र सरकारनं केंद्राकडे तब्बल २९ हजार ७८१ कोटी रुपयांची मदत मागितली होती. मात्र, त्यापैकी आतापर्यंत केवळ एक हजार कोटी रुपयेच मिळालेत. म्हणजे मागणीच्या अवघे सव्वातीन टक्के! उर्वरित मदतीचा प्रस्ताव अजूनही केंद्राकडे प्रलंबित आहे. पण या मदतीला विलंब होण्यामागचं कारण काय? केंद्र सरकारनं निधी दिलेला नाही की राज्य सरकारच्या प्रस्तावातच घोळ आहे? कारण काही प्रस्तावांमध्ये रस्ता खचलेला असताना संपूर्ण रस्ता वाहून गेल्याची नोंद करण्यात आलीय. तर पुलाच्या दुरुस्तीऐवजी थेट नवीन पुलासाठी निधी मागण्यात आलाय. त्यामुळे नेमकं काय घडलंय आणि शेतकऱ्यांच्या मदतीचं पुढं काय होणार? पाहूया आजच्या ॲग्रोवन शोमधून.
Loading content, please wait...