Video
Ashita Nath: अशिता नाथ मुलींना शाळेमध्ये शेती का शिकवतात?
तुमची शाळा कशी होती? शाळेत कोणकोणते विषय शिकवले जायचे? विद्यार्थी इयत्तेनुसार वर्गात बसायचे.. दररोज ५-६ तास शाळेत जायचं.. तासाला शिक्षक येणार, आणि एखादा विषय शिकवणार.. मराठी, इंग्रजी, विज्ञान, हिंदी, गणित, इतिहास, भूगोल.. पण उत्तर प्रदेशच्या एका गावात एक अशी मुलींची शाळा आहे जिथं विद्यार्थीनींना या सगळ्या विषयांसोबत शिकवली जाते शेती.. आश्चर्य वाटत असेल ना.. पण हे खरंय.. या शाळेतल्या मुली स्वत:च बियाणं निवडता, त्याची पेरणी करतात, भाजीपाला उगवतात, माती तपासतात, पिकातलं अंतर ठरवतात.. आता तुम्ही म्हणाल हे काय आहे बुवा? तर ही फक्त एक शाळा नाही.. हे एक स्वप्न आहे एका अशा महिलेचं.. जिला समाजासाठी काहीतरी करायचं होतं.. या शाळेच्या माध्यमातून त्यांनी फक्त शाळाच नाही सुरु केली.. त्यांनी शिक्षणाचा अर्थच बदलून टाकला.. ही गोष्ट आहे अशिता नाथ यांची.. दिल्लीमधल्या सर्व सुखसोयी असलेली नोकरी सोडून त्या आणि त्यांचे पती अनीश दोघं गावी आले.. आणि सुरु केली द गुड हार्वेस्ट स्कुल. भारतातली पहिली शेती आधारित मुलींची प्राथमिक शाळा.. पण या शाळेत शेती का शिकवली जाते.. ही शाळा सुरु करणाऱ्या अशिता नाथ कोण आहेत, ही शाळा सुरु करावी असं त्यांना का वाटलं असेल.. या सगळ्याची उत्तरं जाणून घेऊयात आजच्या या कर्तृत्ववान ती च्या १४ व्या भागातून..
