Farmer Loan Waiver: चंद्रपूरच्या शेतकऱ्याची कंबोडियात विकली किडनी; माणुसकीला काळीमा

राज्य सरकारने कर्जमाफीचं आश्वासन देऊन आता वर्षे लोटलंय. परंतु अद्यापही कर्जमाफीसाठी वेळकाढूपणाच सरकारकडून केला जातोय. त्यामुळे शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्ज वसुलीची टांगती तलवार कायम आहे. त्यातच माणुसकीला काळीमा फासणारी एक धक्कादायक बातमी चंद्रपूर जिल्ह्यातून आलीय. कदाचित तुमच्यापर्यंत पोहचली असेलच. सावकाराच्या थकीत कर्जासाठी चक्क किडनी विकल्याचा हादरवून सोडणारा प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड या तालुक्यात घडलाय. त्यावरून शेतकरी नेत्यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. तर राज्य सरकारने शेतकऱ्याचं सावकारी कर्जही माफ करण्याची मागणी समोर आली आहे. मग चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक सावकाराने कशी केली? किडनी काढून विकण्याचा सल्ला दिला कोणी? या सावकारांवर काही कारवाई झालीय? सगळं काही उलगडून घेऊया आजच्या द अग्रोवोन शोमधून....
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com