Solar Sprey Pump : फवारणी करणं झालं सोपं ? सोलर पंप आहे तरी काय ?

शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करताना पाठीवर पंप घेऊन फवारणी करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीला इजा होऊ शकते. त्यासोबतच आरोग्याला घातक अशी कीटकनाशक अंगावर पडतात.
Solar Sprey Pump
Solar Sprey PumpAgrowon
Published on
Updated on

नाशिक येथे २४ ते २८ नोव्हेंबर दरम्यान कृषीथॉन कृषी प्रदर्शन आयोजित करण्यात आले. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचे (Agriculture Technology) प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. त्यामधील सोलर फवारणी पंप (Solar Pump Sprey) आणि मोबाइल स्टार्टरची (Mobile Starter) माहिती आपण घेणार आहोत. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना फायदा होऊ शकतो. त्यामुळे त्याबद्दल जाणून घेऊ.

Solar Sprey Pump
Agriculture Technology : गवत नियंत्रण करणार मशिन कसं काम करतं ? शेतकऱ्यांना होणार फायदा ?

सोलर फवारणी पंप

शेतकऱ्यांना पिकावर फवारणी करताना पाठीवर पंप घेऊन फवारणी करावी लागते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीला इजा होऊ शकते. त्यासोबतच आरोग्याला घातक अशी कीटकनाशक अंगावर पडतात. त्यामुळे शेतकऱ्याच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन शेतकऱ्यांसाठी सोलर फवारणी पंपची निर्मिती करण्यात आली आहे. या सोलर पंपला पाठीवर घेऊन फवारणी करण्याची गरज नसते. त्याऐवजी चार बाजूला चार चाक या पंपला देण्यात आले आहेत. ज्यामुळे शेतकरी पंप ढकलू शकतो. पुढील भागावरच्या नोझल द्वारे कीटकनाशक पिकांवर फवारणी करता येते. तसेच सौर उर्जेवर फवारणी पंप चालत असल्याने शेतकऱ्यांच्या खर्चात बचत होते.

एवढेच नाही तर शेतकरी या सोलर पंपच्या मागे बसून दुचाकी सारखा प्रवासही करू शकतो. आत्ता वापरण्यात येत असलेल्या फवाऱ्याचा कर्कश आवाज कानाला इजा करू शकतो. सोलर पंप मात्र त्यावर चांगला पर्याय ठरू शकतो. मुंबई आयआयटीच्या मदतीने सोलर फवारणी पंप विकसित करण्यात आला आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हीडीओ पाहा.

मोबाइल स्टार्टर

शेतातली वीज कधी जाईल आणि कधी येईल याबद्दल ठाम काही सांगता येत नाही. अनेकदा रात्रपाळीला शेतकरी पिकांना पाणी देतात तेव्हा वीज येणे जाणे सुरूच असते. अशावेळी प्रत्येक वेळी स्टार्टरकडे जाऊन मोटरपंपाचं स्विच ऑन करावे लागते. मात्र आता त्यातून शेतकऱ्यांची कटकट कमी करण्यासाठी मोबाइल स्टार्टर विकसित करण्यात आले आहे.

मोबाइलच्या मदतीने मोटार कुठूनही सुरू किंवा बंद करता येऊ शकते. एकाच वेळी एका कुटुंबातील १० व्यक्ति मोबाइल स्टार्टर चालू किंवा बंद करू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांची कटकट आता कमी होणार आहे. अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हीडीओ पाहा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com